रंगनाथ स्वामीच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ ची लाट

प्रचारात 'परिवर्तन' च्या उमेदवारांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

वणी बहुगुणी डेस्क : सहकार क्षेत्रात नावाजलेली श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 संचालकासाठी 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. मागील 10 वर्षांपासून पतसंस्थेच्या संचालक मंडळावर ऍड. देविदास काळे गटाची एकहाती सत्ता आहे. परंतु 2022 च्या निवडणुकीत पतसंस्थेचे मतदार ‘परिवर्तन’ घडविणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

20 वर्षापर्यंत वणी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली उभे असलेल्या ‘परिवर्तन पॅनल’ च्या उमेदवारांनी प्रस्थापितांना ‘दे धक्का’ देण्याची जोरदार व्यूहरचना आखली आहे. परिवर्तन पॅनलमध्ये सर्व योग्य व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. पॅनलचे सर्व उमेदवार मतदारांचा थेट संपर्कात असून प्रचारातही आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Podar School

‘परिवर्तन पॅनल’ चे प्रमुख ऍड. भास्कर ढवस आणि डॉ. मोरेश्वर पावडे हे काँग्रेस पक्षाचे जुने आणि अनुभवी नेते आहे. पॅनलचे मार्गदर्शक माजी आमदार वामनराव कासावार यांचा वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील मतदारांवर मोठा प्रभाव आहे. सीवाय घाटंजी, आर्णी, यवतमाळ वरोरा, चंद्रपूर व इतर ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!