महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या प्रयत्नाला यश

जितेंद्र कोठारी, वणी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त चारगाव चौकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले. चारगाव चौकी हा वणी तालुक्याचे केंद्रबिंदू आहे. चारगाव चौकी व परिसरातील नागरिकांना आपल्या समस्या घेऊन वणी येथे पोहोचण्यास येणारे अडथळे व यामुळे पुर्ण दिवस आटापिटा करावा लागतात. तसेच राजू उंबरकर हे अनेकदा दौऱ्यात असल्यामुळे नागरिकांना परत जावं लागत असे. समस्याग्रस्त गोरगरीब नागरिकांची हिरमोड होऊ नये ही बाब लक्षात घेऊन मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी चारगाव चौकी येथे जनसंपर्क कार्यालय व्हावे. असा आग्रह राजू उंबरकर यांच्याकडे केला होता. मनसे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.