रंगनाथमध्ये ‘काळे’ कारनामे..! 3 कोटीच्या प्रशासकीय इमारतीत 2 कोटींचे फर्निचर ?

संचालकाच्या विश्रांतीसाठी फाईव्ह स्टार सुविधेसह रेस्ट हाऊस

बहुगुणी डेस्क : रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संस्थेतील अनेक ‘काळे’ कारनामे उघड होत आहे. संचालक मंडळाने संस्थेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली असल्याचे समोर आले आहे. याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र बँक चौकात रवींद्र ढूमे यांच्या कडून 3 कोटी 15 लाखात खरेदी केलेली 3 मजली इमारत मागील 6 वर्षांपासून धूळखात पडून आहे. तर दुसरीकडे शेवाळकर परिसरात (नाईलाजाने) 3.30 कोटीमध्ये खरेदी केलेल्या बिल्डिंगमध्ये तब्बल 2 कोटी रुपये फर्निचरवर खर्च करण्यात आले आहे. संस्थेच्या पैशाची अशी उधळपट्टी होत असल्याने संचालक मंडळाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित होत आहे.

रवींद्र ढूमे यांच्याकडून खरेदी केलेली 1753 स्के.फूट जागा व त्यावरील 3 मजली इमारत अद्याप पूर्णपणे संस्थेच्या ताब्यात आलेली नाही. तर शेवाळकर बिजनेस पार्कमध्ये 2 हजार स्के.फूट जागेवरील 3 मजली इमारत संस्थेने 3 कोटी 30 लाख रुपयात खरेदी केली. या इमारतीत बँकेची ग्रामीण शाखा, प्रशासकीय भवन व रेस्ट हाउस तयार करण्यातच तब्बल 2 कोटी रुपये फर्निचरवर खर्च करण्यात आले.

‘लोकांचा, लोकांद्वारे, लोकांसाठी’ हे सहकार क्षेत्राचे ब्रीदवाक्य आहे. मात्र रंगनाथच्या संचालकांनी स्वतःच्या ऐशोआरामसाठी संस्थेचे करोडो रुपये स्वाहा केल्याचा आरोप विरोधकानी केला आहे. संस्थेवर अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असल्यामुळे अनेक घबाड फाईलीत दबून आहे. संचालक बदल झाल्यास आतापर्यंत केलेले ‘काळेगोरे’ बाहेर येईल. या भीतीपोटी वर्तमान संचालक मंडळ पतसंस्थेचे सूत्र आपल्या हातात ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे.

परिवर्तन काळाची गरज ..                  दरम्यान एक चांगली पतसंस्था वाचवायची असल्यास परिवर्तन होणे गरजेचे आहे. व परिवर्तन केवळ मतातून करता येते. त्यामुळे संस्थेतील असे ‘काळे’ कारनामे थांबवून संस्थेला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी परिवर्तन पॅनल हाच एक उपाय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!