अल्पवयीन मुलगी रात्रभर घरीच आली नाही…

पहाटे मुलगी सापडताच धक्कादायक माहिती समोर....

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी घडली. सदर प्रकरणातील हा आरोपी देखील एका विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन) असून तो राजूर कॉलरी येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी विधीसंघर्ष बालकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन पीडिता ही राजूर येथील रहिवाशी आहे. ती शुक्रवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ती घरी न सांगता बाहेर निघून गेली. मात्र रात्र झाली तरी देखील मुलगी घरी परत आली नाही. दरम्यान मुलींच्या पालकांची शोधाशोध सुरू होती. दुस-या दिवशी पहाटे 5 वाजताच्या सुमारास शेजारच्या महिलेने पीडितेच्या पालकांना त्यांची मुलगी WCL क्लबकडे जाताना दिसल्याची माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पालकांनी जाऊन त्या परिसराचा शोध घेतला असता तिथे ती आढळून आली. तिला अधिक विचारणा केली असता तिने राजूर कॉलरी येथील एका मुलाने तिला सदर ठिकाणी बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली. पीडितेच्या आईने तात्काळ वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली.

पोलिसांनी तक्रारीवरून भादंविच्या कलम 363, 376 (3) व सहकलम 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माया चाटसे करीत आहे.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.