बलात्कार पीडितेला न्याय मिळावा, संत रविदास युवा मंचाची मागणी

उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

0

महेश लिपटे,वणी : चर्मकार समाजातील युवतीवर झालेल्या बलात्कार व खुन प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीकरिता उपविभागीय अधिकारी,वणी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना संत रविदास युवा मंच,वणीतर्फे निवेदन दिले.

सांगली जिल्ह्यातील चर्मकार समाजातील युवतीचा बलात्कार करून गळा आवळून हत्या करण्यात आली. गावापासून एक किमी अंतरावरील ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. या अमानवी कृत्याचा युवा मंच तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अॅट्रॉसिटी अॅक्टची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आली.

निवेदन देताना राजू वाघमारे व महेश लिपटे यांनी मागण्यांची मांडणी केली. यावेळी प्रदीप खोब्रागडे, हेमंत वाघमारे, योगेश सोनोने, अमोल बांगडे, आकाश डुबे,रवी धुळे, मंगेश सोनोने, संदीप वाघमारे, शैलेश वाघमारे, शाम गिरडकर, रवी कोरडे, प्रवीण टिकले, अनिकेत वाघमारे, प्रदीप टिकले, किसन कोरडे तसेच इतर समाजबांधव प्रामुख्याने उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.