विवेक तोटेवार, वणी: 27 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या नीलेश चौधरी (32) रा. रासा यांचा मृतदेह 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास रासा जवळील फुलोरा जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हत्या की आत्महत्या हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. तपासा अंती आज 16 सप्टेंबर गुरुवारी पोलिसांना हत्या असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी चार आरोपींना अटक व एक विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, 27 ऑगस्ट रोजी निलेश सुधाकर चौधरी (32) रा. रासा हे घरून बेपत्ता झाले होते. याबाबतची तक्रार वणी पोलिसात 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी देण्यात आली. व 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास निलेश यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत रासा येथील फुलोरा जंगलात आढळून आला. मृतकाची बहिण सीमा मोहन गाडगे हिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 302, 34 भादंवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. वणी पोलिसांपुढे आत्महत्या की घातपात असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर तपासाअंती चार आरोपी व एक विधिसंघर्ष बालकाने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
त्यांना आज 16 सप्टेंबर गुरुवारी अटक करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रशेखर दुर्गे (33) रा. रासा यांचे निलेश यांच्या पत्नीसोबत संबंध होते. ही बाब निलेश याला माहीत होताच त्याने आपल्या पत्नीला माहेरी पाठविलायची माहिती आहे. याचा वचपा काढण्यासाठी चंद्रशेखर गोसाई दुर्गे (32), आशिष बाबाराव पिदूरकर (25), गौरव कैलास दोरखंडे (22), योगेश विद्याधर उघडे (20) व एक विधिसंघर्ष बालक यांनी रासा येथे पार्टी केली.
त्यानंतर याचा ठिकाणी निलेश याच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यांनतर निलेश यालाही याच जंगलात बोलाविण्यात आले. निलेशला दारू पाजून त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत अटकवून ठेवण्यात आले. व घटनास्थळावरून पसार झाले. सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. डीबी प्रमुख आनंदराव पिंगळे यांनी तपस करीत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी शाम संजय पूज्जलवार, ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख आनंदराव पिंगळे, एपीआय माया चाटसे, सुदर्शन वनोळे, सुनील खंडागळे, हरेंद्र भारती, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, मोहम्मद वसीम आदींनी केली.
हे देखील वाचा-
Comments are closed.