आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला पुनर्वसन अधिका-यांची भेट
अधिकारी कर्मचारी व कामगारांचा घेतला आढावा
सुशील ओझा, झरी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन अधिकारी यांनी झरी तालुक्याला भेट दिली. यात त्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन परिसरातील कंपनीची संपूर्ण महिती घेतली. झरी येथील सभापती यांच्या क्वार्टर मध्ये तयार केलेली कोरोना टाइम रूमची पाहणी केली. तिथून मुकूटबन येथील ग्रामीण रुग्णालयात आयसो लेटर रूमची पाहणी केली.
मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट फॅक्ट्रीमध्ये बाहेर राज्यासह महाराष्ट्र व लोकल हजारो कामगार काम करीत असल्याची माहिती मिळताच आपला ताफा कंपनीत वळविला व कंपनीला भेट दिली. कंपनीचे अधीकारी व्यास व दत्ता यांच्याकडून कंपनीतील कामगाराबाबत विचारणा केली. कंपनीने कोरोनाची लागण महाराष्ट्रत येताच सर्वांची मेडिकल चाचणी केल्याचे सांगितले असून कोणताही कामगार कोरोना पोसिटीव्ह नसल्याचे सांगितले.
कंपनीत ३ ते ४ हजार कामगार असून आम्ही सर्व जवाबदारी पार पाडत असल्याचे कंपनीचे अधिकारी दत्ता यांनी उपस्थीत जिल्हा पुनवर्सन अधिकारी देशमुख यांना दिली. यावरून देशमुख यांनी कोरोनाबाबत काय काय उपाययोजना करायचा याबाबत माहिती दिली. व तालुक्याला कोरोना वायरची कोणतीही भीती नसल्याचे सांगितले व कोरोना पासून दूर राहण्याच्या सरकारने दिलेल्या टिप्सचे पालन करावे असे सांगण्यात आले त्यावेळी बांधकाम क्र २ चे जिल्हा परिषद बांधकाम अभियंता दिवषटवार तहसीलदार जोशी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव ठाणेदार धर्मा सोनुने उपस्थित होते.