मुकुटबन बाजार समितीत मास्कचे वाटप

कामगार व कर्मचा-यांना करण्यात आले मार्गदर्शन

0
सुशील ओझा, झरी: कोरोना वायरस पासून बचावाकरीता मुकूटबन बाजार समितीमध्ये कर्मचारी, मापारी व शेतकऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिव रमेश येलटीवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सभापती संदीप बुरेवार, उपसभापती संदीप विचू, संचालक सुनील ढाले, अरुण एनगंटीवार, कर्मचारी दयाकर, एनगंटीवार, मनोज अडपावार आदी उपस्थित होते.
कोरोनाचा विष्णुपासून वाचण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने बाहेरून घरी येताच डेटॉल किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावे सर्दी खोकला टॅप किंवा कोरोनाचे लक्षण आढल्यास त्वरित नजिकच्या दवाखान्यात दाखवावे, शिंकताना तोंडावर रुमाल ठेऊन शिंकावे. असे मार्गदर्शऩही करण्यात आले.
Leave A Reply

Your email address will not be published.