रविनगरमधील ‘तो’ संशयीत अखेर निगेटीव्ह

आता वणीकरांचे लक्ष खरबड्यावर

0

जब्बार चीनी वणी: वणीमधले ज्या पाच व्यक्तींना यवतमाळ येथील आयसोलेशन वार्डमध्ये हलवण्यात आले होते. त्यातील रविनगर येथील रहिवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आज रिपोर्ट आल्यानंतर संध्याकाळी उशीरा त्याला डिसचार्ज देण्यात आला असून रात्री तो वणीत पोहोचणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गेल्या तीन दिवसांपासून रविनगर संशयीताबाबत पसरवण्यात आलेल्या अफवांना आता विराम मिळाला आहे. मात्र आता संपूर्ण वणीकरांचे लक्ष आता खरबडा येथील तीन संशयीतांवर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविनगर येथील तो रहिवाशी जर्मनीत उच्च शिक्षणासाठी आहे. सध्या जगभर कोरोनाच्या प्रसारामुळे तो 20 मार्चला भारतात परतला होता. तेव्हापासून तो होम कॉरेन्टाईन होता. तीन दिवसांआधी त्या व्यक्तीचे जर्मनीतील रूम पार्ट पॉझेटिव्ह आल्याचे कळल्याने त्याने याची माहिती प्रशासनाला दिली. त्यावरून त्याला यवतमाळ येथे हलवण्यात आले. तिथे त्याची तपासणी करण्यात आली व नमुने तपासणीकरीता पाठवण्यात आले होते. आज ते रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वणीत पसरला होता अफवांचा बाजार
रविनगर येथील त्या व्यक्तीला यवतमाळ येथे हलवण्यात आल्यानंतर अफवांना एकच पेव फुटले होते. त्या परिसरातील लोकांकडून याची माहिती त्यांच्या संबंधीतांना दिली. यावरून सोशल मीडियावरून वणीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याची एकच अफवा पसरली. या अफवेमुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही माहिती मिळत आहे.

आता लक्ष खरबड्यावर….

रविनगर मधील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने वणीकरांचे आता संपूर्ण लक्ष खरबड्यातील रिपोर्टकडे वळले आहे. खरबड्यातून 3 लोकांना यवतमाळ येथील आयसोलेशन वार्डात पाठवण्यात आले होते. ते व्यक्ती निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. संशयीतांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आल्याने वणीमध्ये अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. त्याचा त्रास त्यांच्या कुटुंबीयांना होत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा: अशा पसरल्या वणीत अफवा…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.