सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुभाष गजभिये होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक सुनील उत्तरवार होते. याशिवाय शाळेचे शिक्षक आशिष साबरे, नितीन मनवर, प्रशांत गावंडे, रवी चहारे, आरती वैद्य, प्रिया कडू, उषा डोये, माधुरी कोकमवार व इतर शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना काळ सुरू असल्यामुळे शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार गणराज्य साजरा करण्यात आला. योग्य शारीरिक अंतर आणि मास्क लावून कार्यक्रम साजरा केला. प्रमुख अतिथी सुनील उत्तरवार यांनी ध्वजारोहण करून राष्ट्ध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्यध्यापक सुभाष गजभिये यांनी अध्यक्षीय भाषण केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण केले.
आरती वैद्य आणि प्रिया कडू यांनी सुद्धा गणराज्य दिनाच्या औचित्यावर मनोगते व्यक्त केले. मुख्याध्यापक सुभाष गजभिये यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष साबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी चहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
सशस्त्र सेना दलात निवड झालेल्या युवक-युवतींचा प्रजासत्ताक दिनी गौरव