शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा

प्रसुती झालेल्या महिलेचा साडीचोळी देऊन सन्मान

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर हे प्रमुख अतिथी होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय कोहळे व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मारोती पंधरे यांनी केले. तर ध्वजारोहण बंडू चांदेकर यांच्या हस्ते झाले.

ध्वजारोहणानंतर प्रसुती झालेल्या महिलेचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. अभिनय कोहळे यांच्यासह सर्वांनी राष्ट्रीय तंबाखू मुक्तअभियाना अंतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. तर बंडू चांदेकर यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या कामाबद्दल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अभिनय कोहळे, नंदा पाटील (LHV), रोशनी बागडे( LHV), कल्पना थुल (ANM), शीतल आगदारी (Staff Nurse), आशिष जुमनाके (HLL), प्रवीण आस्वले (MPW), आशा पर्यवेक्षिका विना पाचभाई, सतीश डंबारे (वाहनचालक), सुनील पायघन (परिचर) यांच्यासह आशासेविका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

हे देखील वाचा:

दारू तस्करांच्या आवळल्या मुसक्या, नांदेपेरा चौफुलीवर कारवाई

मुकुटबन येथे गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Leave A Reply

Your email address will not be published.