युवासेना राबवणार ‘घरोघरी शिवसेना’ अभियान

आगामी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात युवासेनेची बैठक

0

जब्बार चीनी, वणी: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आज शनिवारी दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी शहरातील शासकीय विश्राम गृहात शिवसेना प्रणीत युवासेनेची बैठक झाली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या आदेशावरून ही बैठक घेण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी नगरपालिका संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. येत्या काळात वणी नगरपालिकेची निवडणूक आहे. नगरपालिका निवडणुकीत तरुण तरुणींना अधिक संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुण-तरुणींना युवासेना तर सर्वसामान्यांना शिवसेनेशी जुळण्यसंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय शहरातील प्रलंबीत प्रश्न व समस्या यावरही पदाधिका-यांमध्ये चर्चा झाली.

‘घरोघरी शिवसेना’ अभियान राबवणार – विक्रांत चचडा
शहरवासीयांच्या समस्या सोडवण्याचा युवासेना नेहमीच प्रयत्न करीत आहे. त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत युवासेनेचे पदाधिकारी व सदस्य घरोघरी शिवसेना हे स्थानिक पातळीवरचे अभियान राबवणार आहे. या अभियानांतर्गत युवासेना सदस्य घरोघरी जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ‘घरोघरी शिवसेना’ हे अभियान विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात राबवले जाणार आहे.
– विक्रांत चचडा, जिल्हाप्रमुख युवासेना

बैठकीला सतीश व-हाटे, कुंदन टोंगे, अनुप चटप, पवन घोंगे, हेमंत गौरकर, रुपेश डाहुले, बंटी येरणे, कुणाल लोनारे, बंटी सहानी, सौरभ खडसे, प्रफुल्ल बोर्डे, शिवराम चीडे, नीलेश चिंचोलकर, मंगेश तलांडे, विक्की गिरटकर, प्रतिक चेडे, प्रवीण डोहे, सूरज चीडे, मंगेश उपरे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

हे देखील वाचा:

दारू तस्करांच्या आवळल्या मुसक्या, नांदेपेरा चौफुलीवर कारवाई

वणीत उद्यापासून बळीराजा व्याखानमालेला सुरुवात

Leave A Reply

Your email address will not be published.