ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रजासत्ताक दिनानिमित्त मारेगावमध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम दिनांक शुक्रवार दिनांक 25 जानेवारी व शनिवारी 26 जानेवारीला रंगणार आहेत. या कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण ज्यु. जानी लिवर राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान घेण्यात येणा-या नृत्य स्पर्धेत परिसरातील स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजक स्वरधारा ग्रुपतर्फे करण्यात आले.
येथील संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था द्वरा संचालित स्वरधारा ग्रुपच्या वतीने मारेगाव शहरात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणीक कार्यक्रम घेण्यात येते. या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त यामध्ये 25 जानेवारीला एकल व समूह नृत्य स्पर्धा आयोजित कऱण्यात आली आहे. यामध्ये समूह साठी अनुक्रमे 15 हजार, 10 हजार व 5 हजार रुपए तर एकल साठी 5 हजार, 3 हजार, व 2 हजार रोख बक्षीस व मानचिन्ह ठेवण्यात आले आहे.
तसेच 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व शैक्षणिक साहित्य वाटप, 5 वाजता नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण व 6 वाजता “अब तुम्हारे हवाले वतन साथियों” या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ज्यु.जानी लिवर म्हणून ओळख असलेले अमर सहारे, मुंबई हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
एकल व समूह नृत्य स्पर्धत तमाम स्पर्धकानी आपला सहभाग दिनांक 24 जानेवारी परंत नोंदवावा असे आवाहन स्वरधारा ग्रुपचे नागेश रायपूरे, अशोक कोरडे, आकाश बदकी, सचिन देवाळकर, विवेक बोबडे, श्रीकांत सांबजवार, आशिष येरणे, शेख इफ़्तेख़ार, लाभेश खाडे, हरीश नेहारे, संदिप नागोसे, सागर लोणारे यांनी केले आहे,