देशव्यापी निषेध दिनानिमित्त विविध मागण्यांचे पंतप्रधानांना निवेदन

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना मदत करण्याची माकपची मागणी

0

जब्बार चीनी, वणी: देशात आधीच बेरोजगारीने जनता त्रस्त असताना लॉकडाउन मध्ये 15 कोटी जनतेचा रोजगार हातातून गेला. त्यामुळे देशातील प्रचंड मोठा जनविभाग भुकमरीच्या उंबरठ्यावर आलेला आहे. या परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांना आत्मनिर्भर व्हायला सांगते आहे. ह्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेध केला असून आज दिनांक 16 जून रोजी संपूर्ण देशभर निषेध दिनाचे निमित्ताने जनतेसाठी आवश्यक केल्या जाणाऱ्या गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. यासाठी माकपचे वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

शेतकऱ्यांना विना अट पीक कर्ज देण्यात यावे, शेती पंपाकरिता मोफत व २४ तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला ७५०० ₹ रोख देण्यात यावे, सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत देण्यात यावे, बेरोजगारांना ताबडतोब बेरोजगार भत्ता जाहीर करावा, मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन २०० दिवस रोजगार देण्यात यावा, शहरी कामगारांसाठीही मनरेगा सुरू करून रोजगार द्यावा, राष्ट्रीय संपत्तीची लूट व सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा.

कामगार कायदे रद्द करण्याचे धोरण मागे घ्या, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, जबरानजोत शेतकऱ्यांना बळाच्या वापर करून जमिनीवरून हुसकावणे बंद करा आदी मागण्यांचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले आहे.

यावेळेस कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, मनोज काळे, ऍड विपलव तेलतुंबडे, शिवशंकर बांदूरकर, नंदकिशोर बोबडे, शंकर भगत, दिगंबर सहारे, दशरथ येनगंटीवार, श्रीकांत सरमोकदम उपस्थित होते.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.