शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोडावनमध्ये व्यापाऱ्यांच्या माल
शेतमाल तारण योजनेचे गोडावन व्यापाऱ्यांना घशात ... वणी बाजार समितीत मनसेचा राडा
काय आहे शेतमाल तारण योजना ..! शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक गाव पातळीवर शेतीतून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा नसतात. त्यामुळे शेतीमालाचे काढणी नंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. त्याच वेळेला सर्वांचे शेतमाल एकत्र आल्याने शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. शेतकऱ्यांना शेतमाल साठवणून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास, त्या शेतमालास जास्त बाजार भाव मिळू शकतोआणि शेतकऱ्याला त्याच जास्त फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा मिळावा, या दृष्टीकोनातून विचार करून कृषि पणन मंडळाद्वारे 1990-91 पासून शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
शेतमाल तारण योजना फक्त शेतकऱ्यांसाठीशेतमाल तारण योजनेअंतर्गत फक्त शेतकऱ्यांनाच शेतीमाल तारण ठेवून कर्ज योजनेचा लाभ घेता येते. शेतकऱ्याने बाजार समितीकडे तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे. शेतकऱ्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्यादिवसाचे चालू बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल, ती ठरविण्यात येते. कर्जासाठी तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची आहे.
Comments are closed.