ईशान मिनरल्स तर्फे गरजू कुटुंबांना रेशन वाटप
तहसिलदार व नायब तहसिलदार यांची प्रमुख उपस्थिती
सुशील ओझा, झरी: अडेगाव येथील ईशान मिनरल्स कंपनीतर्फे तालुक्यातील मांगली येथील 12, जामनी येथील 11 व पाटण येथील 7 अशा एकूण 30 गरजू गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन वाटण्यात आले. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साबण, तिखट, मीठ, मसाला व इतर वस्तुंचा समावेश आहे. तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू कुटुंबांना रेशनचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन मुळे विविध राज्यातील हजारो लोक तालुक्यात अडकून आहेत. यात खासगी कंपनीत काम करणारे मजूर तसचे पाणीपुरी, कुल्फी, आईस्क्रीम विक्रेते, तसेच खाट (लाकडी पलंग) विक्रेते इत्यादींचा समावेश आहे. तर अनेक मध्यप्रदेश उत्तरप्रदेश व इतर राज्यातील कामगार व ट्रक ड्रायवर अडकून बसले आहे. या लोकाना कोणतेही काम नसल्याने तसेच जेवणाकरिता कोणतेही ठिकाण नसल्यामुळे त्यांचे मोठे हाल होत आहे.
ही बाब लक्षात येताच ईशान मिनरल्सचे मालक राजकुमार अग्रवाल यांनी त्यांना आधार देण्याचा निश्चय केला. त्यांनी तहसीलदार जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर व ईशान मिनरल्स चे सहायक म्यानेजर मनोज सिंग यांच्या हस्ते वरील तीनही गावात जाऊन रेशनचे वाटप केले. यापुढे गरजुंना रेशन वाटप केले जाईल अशी माहिती राजकुमार अग्रवाल यांनी दिली.