रेशनकार्ड धारकांना मिळणार 3 महिन्यांचे धान्य 

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार धान्य

0

जब्बार चीनी, वणी: वणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या सर्व मार्केट, व्यवसाय, उद्योग बंद आहे. त्यामुळे गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील 33 हजार गरीब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य याच महिन्यात वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र याची अंमलबजावणी काही अडचणीमुळे एप्रिलच्या पहील्या आठवडयात होणार असल्याने एप्रिलचे रेशन घेताना पुढील तिन्ही महिन्याचे रेशन दिले जाणार आहे. शिवाय हे रेशन मोफत नाही. ज्या किमतीत रेशन मिळते त्याच किमतीत ते मिळणार आहे. फक्त एका महिन्याऐवजी 3 महिन्याचे रेशन एकाच वेळी दिले जाणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग  शासन प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत . तसेच २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये , धान्याच्या लाभापासून वंचित राह नये, यासाठी शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य वितरण चालू महिन्यात (मार्चमध्ये) करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे.

एप्रिलच्या रेशनसोबतच मिळणार मे आणि जूनचे रेशन
शासन आदेशानुसार तालुक्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य वितरण प्रिल महीन्याच्या पहील्या आठवडयात करण्यात येणार आहे- ओंकार पडोळे
निरीक्षण अधिकारी वणी

Leave A Reply

Your email address will not be published.