ब्रेकिंग न्यूज: शिवसेना (शिंदे) गटाला मोठा धक्का, यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा ?
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ
जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना (शिंदे) गटाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन बैजंकीवार यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चेमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. संजय राठोड यांचे खंदे समर्थक गजानन बैजंकीवार यांची 2 महिन्यांपूर्वीच शिवसेना (शिंदे) गटाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गजानन बेजंकीवार यांनी गुरुवार 12 जानेवारी रोजी आपल्या पदावरून राजीनामा दिल्याची खात्रीलायक माहिती ‘वणी बहुगुणी’ला मिळाली आहे. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष गजानन बैजंकीवार यांनी राजीनामा दिल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र राजीनाम्याच्या चर्चेमुळे जिल्ह्यात विविध तर्क वितर्क लावले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची व जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेऊन अनेकांनी शिंदे गट जॉईन केला आहे. मात्र सध्या शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतचा वाद कोर्टात गेलेला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नुकतेच शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्ते व नेते द्विधा मनस्थितीत दिसून येत आहे. उद्या जर निकाल विराधात लागला तर त्यांचे संपूर्ण राजकीय कारकिर्द पणाला लागणार ही भीती देखील शिंदे गटातील नेत व कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे. आता या रामीनाम्याचे वणी व परिसरातील नेते व कार्यकर्त्यावर काय परिणाम होईल हे येणा-या काही दिवसात स्पष्ट होईल.
Comments are closed.