मुख्याध्यापक सुरेश घोडमारे यांचा सेवानिवृत्तीसाठी सत्कार

सपत्निक भेट वस्तू आणि सवाष्ण वाण देऊन केले सन्मानित

0

विलास ताजने, वणी: मार्डी येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश नामदेव घोडमारे सेवानियत काळानुसार 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्निक सत्कार शाळेच्या वतीने बुधवारी दुपारी करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, भेटवस्तू , पुष्पगुच्छ त्यांना दिलेत. तसेच त्यांच्या पत्नी ह्यांना सवाष्ण वाण देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक भा. न. धानफुले, सत्कारमूर्ती सु. ना. घोडमारे, शशिकला घोडमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरी बोबडे, ज्ञानेश्वर चटकी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.भास्कर राऊत यांनी केले. यावेळी प्रा.सुरेश नाखले, शिक्षक पंढरी बोबडे, विलास ताजने, ज्ञानेश्वर चटकी, लता वातीले आदी शिक्षकांनी घोडमारे सरांच्या सेवेतील कार्यप्रणाली आणि आठवणीवर उजाळा टाकला. शिक्षक सेवेत असताना योग्य मार्गदर्शन करून आदर्श विद्यार्थी घडविण्याच कौशल्य घोडमारे गुरुजींच्या अंगी आहे. असे अध्यक्षीय भाषणातून भास्करराव धानफुले म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना सुरेश घोडमारे म्हणाले, ‘मी शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक अशा विविध पदांवर कामं केलीत. सेवेत असताना आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आदर्श विद्यार्थी घडविण्याचे प्रयत्न केलेत. मला माझ्या कार्यात सहकारी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच नेहमीच सहकार्य लाभलं. माझा केलेला सन्मान सदाही स्मरणात राहील. कार्यक्रमाचे संचालन रमेश ढुमणे यांनी केले. आभार अनंत शिवरकर यांनी मानले. कार्यक्रमाला नीता मेश्राम, अंकुश कांबळे, भास्कर जीवतोडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.