वणीकरांचे वीजबिल शून्य करण्याची संधी; आजच छतावर लावा सोलर प्लान्ट

सोलर मशिनचा बादशहा आता सोलर प्लांट क्षेत्रात; आर.एन. सोलरची दमदार एंट्री

बहुगुणी डेस्क, वणी: वणी परिसरात ‘सोलर मशिनचा बादशहा’ म्हणून ओळख असलेले आर.एन. एन्टरप्राईजेसचे निकेश निब्रड यांनी नव्या वर्षात सोलर प्लांट क्षेत्रात दमदार आणि विश्वासार्ह पाऊल टाकले आहे. भारताची नंबर 1 सोलर पॅनल उत्पादक कंपनी WAAREE (WAARII) चे अत्याधुनिक, उच्च दर्जाचे सोलर प्लांट्स आता थेट वणीकरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. यामुळे वणी शहर व परिसरातील नागरिकांना आता स्वतःची वीज स्वतः निर्माण करून वीजबिल शून्य करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

आर.एन. एन्टरप्राईजेसतर्फे वणी शहरात आणि परिसरात ठिकठिकाणी सोलर प्लांट बसविण्याचे काम वेगात सुरू असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी सोलर हा दीर्घकालीन आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. सोलर प्लांटविषयी अधिक माहिती, डेमो किंवा कोटेशनसाठी 9767816735 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा आर.एन. सोलर (ISO 9001:2015), वरोरा रोड, वणी येथील कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन निकेश निब्रड यांनी केले आहे.

सौरऊर्जेचे फायदे
सतत वाढणाऱ्या विजेच्या बिलामुळे हैराण झालेल्या घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी सौरऊर्जा हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बिलात तब्बल 80 टक्क्यांपर्यंत बचत करता येते. कमी देखभाल खर्च, दीर्घकाळ टिकणारी प्रणाली आणि पर्यावरणपूरक ऊर्जा ही सौरऊर्जेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहे.आर.एन. सोलरतर्फे बसविण्यात येणाऱ्या सोलर प्लांटमुळे ग्राहकांना विजेच्या बिलात मोठी बचत, अतिशय कमी मेंटनन्स खर्च, अवघ्या 4 ते 5 वर्षांत संपूर्ण खर्चाची परतफेड तसेच शासनाकडून आकर्षक सबसिडीचा लाभ मिळणार आहे. या सर्व सुविधांमुळे वणी परिसरातील नागरिकांना पर्यावरणपूरक ऊर्जेचा लाभ घेण्याची आणि विजेच्या बिलाचा ताण कमी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

शासनाची सबसिडी किती?
घरातील वीज वापरावरून सोलर प्लांटची क्षमता ठरवली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या घरात 200 ते 225 युनिट वीज वापर होत असेल, तर 2 किलोवॅटचा सोलर प्लांट पुरेसा ठरतो. त्यासोबत शासनाकडून खालीलप्रमाणे सबसिडी दिली जाते—

  • 1 किलोवॅटपर्यंत – सुमारे 120 युनिट वीज निर्मिती, ₹30,000 सबसिडी

  • 2 किलोवॅटपर्यंत – सुमारे 240 युनिट वीज निर्मिती, ₹60,000 सबसिडी

  • 3 किलोवॅट व त्यापेक्षा जास्त – सुमारे 360 युनिट वीज निर्मिती, कमाल ₹78,000 सबसिडी

याशिवाय सोलर प्लांट बसविण्यासाठी विविध बँकांकडून कर्जपुरवठ्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पत्ता – आर.एन. सोलर (ISO 9001:2015) 
कार्यालय – ब्लॉक नंबर 38, ओरीजीन कॉम्प्युटरजवळ, वरोरा रोड, वणी
नवीन गोडावून – हनुमान मंदिराजवळ, जैन ले-आऊट
डेमो व कोटेशनसाठी संपर्क 📞 9767816735 (कस्टमर केअर)
📞 निकेश निब्रड – 8999952507 (संचालक व टेक्निकल हेड)
📞 रोशन आवारी – 8605058037 (मार्केटिंग हेड)

वीजबिलाचा वाढता बोजा कमी करून आर्थिक बचत करण्याची, स्वतःची वीज स्वतः निर्माण करण्याची आणि शासनाच्या आकर्षक सबसिडीचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ आहे. पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी सुरक्षित ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी आर.एन. सोलर हा वणीकरांचा विश्वासार्ह पर्याय ठरत असून, सोलर ऊर्जेकडे वळण्याची ही सुवर्णसंधी अजिबात दवडू नका, असे आवाहन आर.एन. सोलरतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.