सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळी समाज कार्यालयाचा शुभारंभ

समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी नवे व्यासपीठ

भूषण आदे,वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी वणी येथे माळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला. भास्कर वाढई कॉम्प्लेक्स, बस स्टॉप समोर, सरकारी दवाखाना रोड येथे दुपारी 3 वाजता झालेल्या या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून निलेश चौधरी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आत्राम, विजय पिदुरकर, राकेश बुग्गेवार, संजू पिंपळकर, सोनाली निमकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाढई यांनी केले.

माजी आमदारांनी आपल्या भाषणात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समाज बांधव व भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाडे यांनी सांगितले की, “या कार्यालयाची निर्मिती माळी समाजाचे संघटन, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय उन्नती साधण्यासाठी करण्यात आली आहे. शिक्षण, रोजगार, विवाह आणि सामाजिक सुधारणांसाठी एकत्र येऊन समाजाच्या हक्कांसाठी लढा देण्याकरिता हे कार्यालय उपयुक्त ठरेल. समाजाला दिशा देण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.”

 

या सोहळ्याने वणीतील माळी समाजाला एक नवे व्यासपीठ मिळाले असून, समाजाच्या प्रगतीसाठी हे कार्यालय भविष्यातील मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

 

Comments are closed.