रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराचा चिरडले

दुचाकीस्वार जागीच ठार तर एक किरकोळ जखमी

0

सुशील ओझा, झरीः तालुक्यातील मांगली (हिरापूर) गावाजवळ पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून येत असलेल्या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार भीमराव वामन टेकाम (26) रा. मारोती (पुसाम गुळा) मंडळ ,बेला जिल्हा आदीलाबाद हा जागीच ठार झाला. तर सहकारी किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान घडली.

Podar School 2025

मांगली (हि.) गावपरिसरातील पैनगंगा नदी पात्रातून रेतीची वाहतूक करणारा ट्रक क्र MH29 8232 ने समोरून येणारी दुचाकी क्र. TS 01 E K 4905 ला बाजू देत असताना दुचाकी लगतच्या शेणखताच्या उकिरड्यावर घसरून दुचाकीस्वार भीमराव वामन टेकम ट्रकच्या मागच्या चाकात येऊन जागीच ठार झाला। तर सहकारी धर्मराज आत्राम हा किरकोळ जखमी झाला। हे दोघेही कमलापूर (अर्धवन) येथे लग्नासाठी आले होते। आपल्या गावाकडे परत जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहेत ।

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एक वर्षापूर्वी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने मांगली येथील शालेय विद्याथीनीला जबर धडक दिली. त्यात ठार केले होते. मोठे व किरकोळ अपघात या मार्गावर नेहमीच होतात. अपघाताची माहिती मिळताच मुकुटबन पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.