वाघ आणि शेतकऱ्याचा प्रत्यक्ष सामना होतो तेव्हा…

शिबला वनपरिक्षेत्रात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला

0

सुशील ओझा, झरीः दुपारची वेळ होती. तो शेतात आपले नियमित काम करीत होता. शेतात काम करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केला. वाघाच्या हल्ल्याची घटना कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत वाघाने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले होते. ही घटना बुधवारी दुपारी 2च्या सुमारास तालुक्यातील शिबला वनपरिक्षेत्र अंतर्गत हिवरा (बारसा) वनवर्तुळात घडली. या हल्ल्यात शेतकरी दामू बापूराव आत्राम (55) जखमी झाले. दामू आत्राम यांच्या मानेला व खांद्याला दुखापत झाली।

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जखमी दामू यांना पुढील उपचाराकरिता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाचा हल्ला झाल्याची माहिती मिळताच शिबला वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनास्थळाची पाहणी केली।

Leave A Reply

Your email address will not be published.