डोंगरगाव(दहेगाव) रस्त्याची दूरवस्था, ग्रामस्थांचे हाल

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, 17 जुलैला करणार आमरण उपोषण

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील डोंगरगाव(दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे हाल होत आहे. मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ता पूर्णतः उखडला आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहे. सायकल अथवा दुचाकी नेणे ही कठीण झाले आहे. रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे असल्याने वाहने सुद्धा जात नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. उखडलेल्या रस्त्यावरील खड्यात पाणी साचले आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि एखाद्या रुग्णाला शहरात जायचे म्हटलं तर तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याबाबत डोंगरगावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागील महिन्यात निवेदन देऊन समस्यांचा पाढा वाचला होता. संबंधित उपअभियंता भालशंकर यांनी 30 जून पर्यंत रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र संबंधित अभियंत्यांनी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका बघून वेळकाढू धोरण अवलंबिलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आता आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. येत्या १७ तारखेला डोंगरगाव येथील ग्रामस्थ जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहे. दीपक गोवारकर, मोरेश्वर चांदेकर, विनोद रोगे, कमलाकर ठमके, दीपक मडावी सह जवळपास ४० ग्रामस्थांनी स्वाक्षरी करून याविषयी प्रशासनाला कळविलं आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.