ईद व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

मारेगाव पोलिसांनी दिला शांततेचा संदेश

0

नागेश रायपुरे, मारेगाव: बकरी ईद व रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या करिता पोलीस स्टेशन मारेगावच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला.

Madhav Medical

सध्या कोरोनाचा चा प्रादुर्भाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत असून या कालावधीत अनेक सण उसत्व होत आहे. त्यामुळे शहरात बकरी ईद व रक्षा बंधनाच्या पार्शवभूमीवर शहरातील शांतता कायम राहावी यासाठी शहरातील महामार्गावरून डॉ. आंबेडकर चौक, शिवाजी चौक ते मार्डी चौकातून मार्गक्रमण करत, सामाजिक अंतराचे भान ठेवून रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्च मध्ये मारेगाव पोलीस स्टेशन चे पो.नि. जगदीश मंडलवार, पो.उप.नि. अमोल चौधरी पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी होते.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!