वणीमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन शिथिल

सकाळी 6 ते 5 पर्यंत खरेदी विक्री व सेवासांठी परवानगी

0

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यात कोरोनामुळे वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात 25 जुलै ते 31 जुलैपर्यत संचारबंदी व लॉकडाऊन कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वणीमध्येही सकाळी संध्याकाळी 5 पर्यंत असणारे लॉकडाउन कठोर करून त्याचा वेळ दुपारी 2 पर्यंत करण्यात आला होता. मात्र आता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊऩ शिथिल केला आहे. त्यामुळे आता वणीमध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत बाजार व अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनचा हा वेळ उद्यापासून पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस या शहरात व या शहरालगतच्या परिसरात 31 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊऩसह संचारबंदी करण्यात आली होती. तर उर्वरित तालुक्यात लॉकडाऊन कठोर करण्यात आले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने निर्णय घेत संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदी असलेल्या शहरात लॉकडाऊन व संचारबंदी वाढवली आहे.  तर हे शहर सोडता इतर भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे.

वणीमध्ये दुकान सकाळी 6 ते संध्याकाली 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आधी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतचा वेळ होता. यात सकाळी 4 तास व दुपारी 3 तास अधिकचे देत  शिथिलता आणली आहे. दूध विक्रेत्यांना संध्याकाळी 7 ते 8 घरपोच दूध वाटप करता येईल. शासकीय कामाकरिता व बँकीगचे कामे त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार सुरू राहतील. या दरम्यान नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळणं बंधनकारक असणार आहे. लॉकडाउनचा हा वेळ उद्यापासून पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.

Sagar Katpis

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!