नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र.11 मधील एका सात वर्षाच्या बालकाने मुस्लिम धर्मात पवित्र महिना समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात एका दिवसाचा कडक उन्हाळ्यात रोजा (उपवास) केला. देश लवकरच कोरोना महामारीच्या संकटातून मुक्त व्हावा अशी दुवा करून नमाज अदा केली.
सय्यद खुसरो अजहर अली असे या सात वर्षीय बालकाचे नाव आहे. सय्यद खुसरो हा मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात शिकत आहे. खुसरोचे वडील अजहर अल्ली मुस्ताक अली यांचे मेन रोडवर फ्लॉवर्स चे दुकान आहे.
मुस्लिम धर्मात “रमजान” महिना हा पवित्र समजला जातो. रमजान महिना हा तिन्ही ऋतूंमध्ये येत असतो. मात्र यावर्षी तर चक्क भर उन्हाच्या तडाक्यात 14 एप्रिल पासून सुरू झाला. या रमजान महिन्याच्या कालावधीत 30 दिवसाचे रोजे मुस्लिम बांधव ठेवत असतात. रोजा (उपवासात) सकाळ पासून ते संध्याकाळच्या अजान होईपर्यंत रोजा करावा लागतो.
या दरम्यान काही खाणे तर सोडाच पाणीसुद्धा पीत नाही. अशा कडक उन्हात दिवसभर काही न खाता-पिता सय्यद खुसरो अजहर अल्ली या सात वर्षीय बालकाने एक दिवसाचा रोजा करून देश कोरोनाच्या संकटातून लवकर मुक्त व्हावा अशी दुवा मागून नमाज अदा केल्याने खुसरोचे परिसरात कौतुक होत आहे.
हेदेखील वाचा
आज तालुक्यात कोरोनाचे 46 रुग्ण, 32 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी
हेदेखील वाचा