ऋण रक्षा पॉलिसी ठरली वरदान, 10 लाखांचे कर्ज झाले माफ

नांदेपेरा येथील स्टेट बँक शाखेतर्फे थकबाकी नसल्याचा दाखला वितरीत

विवेक तोटेवार, वणी: नांदेपेरा येथील स्टेट बँकेची ऋणरक्षा पॉलिसिमुळे कर्जदाराचा कर्ज फेडत असतानाच अचानक मृत्यू झाला. त्यांनी स्टेट बँकेची ऋणरक्षा पॉलिसी घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांचे तब्बल 10 लाख 4 हजार रुपये माफ करण्यात आले आहे. स्टेट बँकेची ऋणरक्षा पॉलिसी ही गृह कर्जावर ग्राहकांना संरक्षण देते. 

अमोल अशोक भोयर रा. मजरा ता. मारेगाव यांचे वडील अशोक मारोतराव भोयर यांनी ऑगस्ट 2017 मध्ये नांदेपेरा येथील स्टेट बँकेतून 12 लाख 50 हजार रुपयाचे गृहकर्ज घेतले होते. ते कर्जाचा हफ्ता भरत होते दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा 10 लाख 4 हजार रुपये कर्ज बाकी होते.

त्यांनी बँकेची ऋणरक्षा पॉलिसी घेतली होती त्यामुळे त्यांच्यावर बाकी असलेले कर्ज बँकेकडून माफ करण्यात आले. व त्यांचा मुलगा अमोल यांना कर्ज थकबाकी नसल्याचा दाखल बँकेकडून देण्यात आला. यावेळी बँकेचे व्यवस्थापक देवानंद बरडे, रोखपाल आशिष वांढरे व कंत्राटी कर्मचारी किशोर कपाडे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.