ऋषिपंचमी निमित्त अर्धवन येथे भक्तांची मांदियाळी

गजानन महाराज देवस्थानात महाप्रसाद आणि अन्य कार्यक्रम

0 161

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथे साधक आश्रम संस्था अर्धवनद्वारे ऋषिपंचमी निमित्त गजानन महाराज देवस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सकाळी १० वाजता पालखी काढण्यात आली. संपूर्ण गावात पालखी फिरवण्यात आली. यात गावातील व परिसरातील हजारो लोकांनी सहभाग घेतला.ग्रामवासी व प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा उपस्थित होती.

पालखीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. महाप्रसादाच्या कार्यक्रमात हजारो लोकांनी सहभाग घेतला. मंदिरामध्ये सकाळपासून पासून सायंकाळपर्यंत भजन पूजन व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यात आले . तालुक्यातील अर्धवन येथे गजानन महाराजांचे एकमेव देवस्थान आहे. या स्थळाला छोटे तीर्थक्षेत्र म्हणून तालुक्यातील भाविक या निमित्ताने मोठी गर्दी करतात. ऋषिपंचमी निमित्त महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व सदस्य यांनी केले होते.

Comments
Loading...