आज ‘साधा माणूस’ येतोय कामाच्या माणसाच्या मदतीला

दु. 3 वाजता प्रभाग क्र 2 मध्ये राजू तुराणकर यांच्या प्रचारार्थ रोड शो व कॉर्नर सभा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 ब मधून अडल्या नडल्यांच्या मदतीला सदैव धावून जाणारा शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक राजू किसन तुराणकर हे उभे आहेत. लोकांची समस्या सातत्याने मांडणारा कार्यकर्ता, समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करून समस्या सोडवणारा कार्यकर्ता अशी त्यांची वार्डातच नाही तर संपूर्ण वणी शहरात ओळख आहे. आज त्यांच्या प्रचारार्थ ‘साधा माणूस’ म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला विलास झट्टे प्रचाराला येणार आहे. दुपारी 3 वाजता प्रभाग 2 मध्ये रोड शो केला जाणार आहे. रोड शो नंतर कॉर्नर सभा होणार आहे. रॅली व कॉर्नर सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू तुराणकर यांनी केले आहे.

सध्या नगरपालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकांच्या मदतीला कायम धावून जाणारा कडवट व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राजू तुराणकर यांची वणी शहरात ओळख आहे. 2006 ते 2011 या कालावधीत ते वार्ड क्रमांक 6 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी नवीन वस्तीच्या समस्या सोडवण्यास सातत्याने प्रयत्न केले. आज या भागात रस्ते, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज व्यवस्था तयार झाली आहे. याचा पाया राजू तुराणकर यांनी रचला होता. या पालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी या समस्या उचलून धरल्या, याचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या नवीन भागात विकासकामांना सुरुवात झाली. याचे श्रेय वार्डातील नागरिक राजू तुराणकर यांना देतात. यंदा राजू तुराणकर हे शिवसेना उबाठा या पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कामाच्या माणसाच्या मदतीला साधा माणूस
मारेगाव तालुक्यातून आलेला रिल स्टार विलास झट्टे हा तरुण केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ‘साधा माणूस’ या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. आपल्या हलक्या फुलक्या रिल्सने लोकांचे मनोरंजन करण्यासह प्रसंगी गंभीर रिल्सने शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न मांडून साधा माणूस प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. यासह त्यांनी एका गाण्याची देखील निर्मिती केली आहे. 

आज दिनांक 30 नोव्हेंबरला दुपारी ठीक 3 वाजता प्रभाग क्र 2 मधून प्रचार रॅली (रोड शो) आयोजित केली आहे. यात आमदार संजय देरकर,  माजी आमदार वामनराव कासावार, मनसे नेते राजू उंबरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे, संजय निखाडे, राजीव कासावार, दीपक कोकास, शरद ठाकरे, इजहार शेख, ॲड देविदास काळे, डॉ महेंद्र लोढा, आशिष खुळसंगे, सुनिल कातकडे, वंदना आवारी, प्रा. शंकर वऱ्हाटे, टिकाराम कोंगरे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कॉर्नर सभेने रोड शोची सांगता होणार आहे.

Comments are closed.