साहित्य संमेलनात आज कोणते कार्यक्रम?
निकेश जिलठे, वणी: वणीत विदर्भ साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमाची मेजवानी वणीकरांसाठी आहे. तर जाणून घेऊया काय आहेत आजचे कार्यक्रम….
शनिवारीचे कार्यक्रम
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सकाळी 9 वाजता ‘संतांचे समाजभान’ या विषयावर डॉ.प्रज्ञा आपटे यांच्या अध्यक्षतेखाली व दुपारी 11 वाजता चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकऱ्यांची दैना आणि आपण सगळे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.दुपारी 1 वाजता कविवर्य विठ्ठल वाघ यांची जेष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी हे मुलाखत घेणार आहे. दुपारी 4 वाजता ‘आधुनिक तंत्रज्ञानाचे अभिजात साहित्य आणि कलेला आव्हान ‘ हा परिसंवाद अजय आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सायंकाळी 5 वाजता दीपक आसेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कवी संमेलन जाणार आहे. तर रात्री 8 वाजता ‘वैदर्भीय गीतगंगा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
रविवारी कोणकोणते कार्यक्रम आहेत ?
संमेलनाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात सकाळी 10 वाजता डॉ.अभय बंग हे ‘विनोबा- शांतता कोर्ट चालू आहे’ या विषयावर बोलणार आहेत.सकाळी 11 वाजता बालाजी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे.तर दुपारी 12 वाजता माध्यमांची ‘बांधिलकी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आली आहे. या संमेलनाचा समारोप दुपारी 2 वाजता ना.नितीनजी गडकरी यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.या प्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, व माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या समारोपानंतर रात्री 8 वाजता वणी शहरातील स्थानिक शाळेतील कलावंताचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.