साई मंदिर ते नांदेपेरा रोडसाठी नागरिकांचे तीव्र आंदोलन

एक आठवड्यात खोळंबलेले काम सुरु करण्याचे आश्वासन

 

पुरुषोत्तम नवघरे, वणी: साई मंदिर ते नांदेपेरा चौकापर्यंत असलेला सिमेंट रस्ता गेल्या कित्येक दिवसांपासून अपूर्ण आहे. नागरिकांना यामुळे रोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्ता तात्काळ पूर्ण करावा यासाठी नागराकंनी वारंवार निवेदन दिले. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर गुरुवारी दिनांक 5 जून रोजी सकाळी नागरिकांद्वारे आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय थोबे यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन झाले. आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अखेर प्रशासनातर्फे एक आठवड्याच्या आत काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

साई मंदिर ते नांदेपेरा रोड हा कायम रहदारीचा रस्ता आहे. आधी केवळ रेल्वे रुळाच्या आधी असलेली वणीतील वस्ती आता रेल्वे रुळाच्या पुढे गेली आहे. शिवाय अनेक शाळा येथे आहेत. त्यामुळे हा रस्ता कायम रहदारीचा असतो. नांदेपेरा मार्गावरील विविध गावातील लोकांना देखील वणीला येण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र या रस्त्याची चाळणी झाली आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव हे काम ठप्प झाले होते. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सकाळी आंदोलनाला सुरुवात
सकाळी 9.30 वाजता साई मंदिर ते नांदेपेरा या मार्गावरील रहिवासी व व्यावासिक यांनी रोडवर आंदोलन सुरु केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान आंदोलनाला बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तांत्रिक त्रुटी दूर झाल्या असून एक आठवड्याच्या आत रस्त्याचे काम सुरु होईल. अशा सूचना कंत्राटदाराला दिल्याचे लेखी पत्र त्यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. जर एका आठवड्यात रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर रास्ता रोको आंदोलन केले जाईल. असा इशारा अजय धोबे यांनी दिला.

आंदोलनात बाबाराव ठाकरे, मोरेशवार पावडे, विजय कवरासे, राजूभाऊ उंबरकर, मनोज राजूरकर, रुपेश राजूरकर, बाळूभाऊ जोगी, राहुल पानघाटे, आशिष रिंगोले, बाबाजी चट्टे, बालाजी मिलमिले, रवींद्र वांढरे, प्रणित कवरासे, अंकुश जयस्वाल, असुटकर, बालाजी काकडे, नितीन मोहितकर, पिटू थोरात यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते.

Comments are closed.