विवेक तोटेवार, वणी: जगात असलेल्या सर्वच धर्मात उपवासाला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. मानवाला उपाशी राहल्यानंतर अन्नाचे महत्त्व लक्षात येते आणि शरीरही उपवास केल्याने निरोगी राहत असल्याचे प्रतिपादन जमत ए इस्लामे हिंदच्या महिला अध्यक्षा सिध्दिका शेख यांनी केले. शनिवारी साई नागरी येथे संपन्न झालेल्या इफ्तार पार्टीत त्या बोलत होत्या.
रोजा ठेवल्याचा परिणाम सरळ मानवाच्या शरीरावर होत असतो. शिवाय आपल्या जीवनात अन्नाचे काय महत्व आहे त्याची जाणीव होण्यासाठी म्हणून रोजा ठेवल्या जातो. मुस्लिम बांधवांमध्ये या महिन्याला अत्यंत पवित्र मानल्या जाते. धार्मिक दृष्टीने रोजा ठेवण्याचे महत्व आहे त्याचप्रमाणे मेडिकल सायन्सनेही रोजाचे मानवी आरोग्याशी संबंधित असल्याचे मान्य केले आहे. साई नगरी येथे झालेल्या इफ्तार पार्टीत अनेक जण शामिल झाले होते.
कार्यक्रमात निमा जीवने, अपंग विद्यालयाच्या प्राचार्य माया आसुटकर, सौ ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सिध्दिका शेख, डॉ उजमा शेख तथा विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमचे संचालन फरहान सैय्यद व पाहुण्यांचे आभार शाहिना सैय्यद यांनी मानले.