अमोल पानघाटे,साखरा (को):परिसरातील साखरा ते माथोली रस्ताची मोठया प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वणी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकांवर असलेले साखरा ते माथोली रस्त्यांची दीन अवस्थ्या झाली आहे. परिसरात नागरिकांना खरेदीसाठी कैलाशनगर येथे वसाहतीमध्ये जावे लागते. या खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत.
सध्या पावसामुळे रस्यांची सर्वत्रच दैना झाली आहे. त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या जीवनावर होत आहे. आजारी, वृद्ध यांना या मार्गावरून नेताना अतोनात हाल होत आहे. रस्त्यांची ही दुर्दशा अनेकदा जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावार नेहमीच किरकोळ अपघात होतच असतात.
वेकोलीचा परिसर असल्याने या मार्गाने अनेक कर्मचारी टूव्हिलर्सने ये-जा करतात. स्थानिकांना मोठी बाजारपेठ म्हणून वणीलाही यावं-जावं लागतं. सध्या शाळा बंद आहेत. एरवी स्थानिक विद्यार्थी बाहेर शिकायला जातात. विविध मोठ्या सेवांसाठी इकडे-तिकडे जावं लागतं. या रस्त्यानेच महत्त्वाची सर्व वाहतूक होते.
या रस्त्यांनी पावसाचे पाणी या खड्यामध्ये साचत आहे. त्यामुळे या रस्त्याला पांदणरस्त्याचे स्वरूप तयार झाले. वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच अपघाताची शक्यता बळकावली. याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्यात यावा. अशी मागणी परिसरातील नागरिक शांताराम उपासे, महेश कुचनकर, निखील उपासे इत्यादी करीत आहेत.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)