समताधिष्टीत समाजव्यवस्थे साठी संविधानाची गरज: डाॅ.महेंद्र लोढा

मार्डी येथे दोन दिवशीय समता पर्व कार्यक्रम संपन्न

0

मारेगाव: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक व्यवस्थेच्या अनिच्छितेतून सर्व समाजाच्या वंचित घटकांना संविधानाच्या माध्यमातून भयमुक्त केले. त्यामुळे भारताचे संविधान हा मानवमुक्तीचा ग्रंथ असुन तो आपल्या देवघरात ठेवण्यापेक्षा त्याचे अध्ययन करुन प्रत्येकांनी आपल्या मेंदूत कोरला पाहिजे. तरच प्रत्येक प्रत्येक व्यक्ती सर्व प्रकारच्या गुलामगिरीतुन मुक्त होईल. त्यामुळेच समताधिष्टीत समाजासाठी संविधानाची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी मार्डी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित समता पर्व कार्यक्रमात आपल्या उद्घाटनिय भाषणात केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकर होते. मार्डी येथील दोन दिवसीय समता पर्वात विविध वैचारिक कार्यक्रमाची मेजवाणी मार्डीकरांना मिळाली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारिपचे ता. अध्यक्ष विनोद गाणार, सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच प्रफुल्ल झाडे, माजी सरपंच सुरेश चांगले, भास्कर धानकुले, तंटामुक्त अध्यक्ष मंगेश देशपांडे, पत्रकार ज्योतिबा पोटे, अनंत जुमळे, जितू मसाळे, मार्डी बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष यशवंत कांबळे प्रामुख्याने विचारपिठावर होते.

भीमजयंती निमित्त 14 तारखेला गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर रात्री स्वरधारा प्रस्तुत भीमगितांचा बहारदार कार्यक्रम झाला त्यात नागेश रायपुरे आणि संच यांनी सादरीकरण केले. हा कार्यक्रम मार्डी करांसाठी समस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक माणिक कांबळे, सुबोध मोडक, अखिलेश कांबळे, सूरज नगराळे, प्रशिक्षण चंदनखेडे, सोनु लिहितकर, डाॅ.प्रशांत पाटील, दिनेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.