मुकूटबन येथे संविधानदिन व बिरसा मुंडा जयंती निमित्त सोमवारी जाहीर व्याख्यान
बहुगुणी डेस्क, मुकूटबन : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश असलेल्या भारताने 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा स्वीकार केला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. संविधानदिन व बिरसा मुंडा जयंतीचे औचित्त साधून, 26 नोव्हेंबरला भारतीय बौध्द महासभा व संभाजी ब्रिगेड तालुका झरी यांच्या संयुक्त विद्यमाने नामवंत व्याख्यात्या वैशाली डोळस यांचे ”संविधान व आजची परिस्थिती” या विषयावर जाहीर व्याख्यान
आदर्श हायस्कूलच्या पटांगणावर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत तर उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत सरपंच शंकर लाकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी गवई गटविकास अधिकारी, धनंजय जगदाडे पो. निरीक्षक ,अजय धोबे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, दीपक बरशेट्टिवार, कपिल श्रुंगारे,भगवान इंगळे अजय जोगदंड उपस्थित राहणार आहेत.
आजची परिस्थिती व संविधान, व संविधानिकदृष्ट्या लोकशाही कशी वाचविता येईल या करिता संविधानदिन व बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून एक दिवशीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आहे. करिता व्याख्यानाला परिसरातील सर्व जनतेनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केले आहे..