राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक शंशाक मुत्यलवार होते. या प्रसंगी विद्यार्थीनी दीक्षांत भगत, समीक्षा काटकर, लीना पाझारे यांनी सविधान दिनाबदल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या शाळेतील शिक्षक नाकले, पारखी, चामटे व चिट्टलवार यांनी संविधान दिनाबदल सविस्तर भाषणे केली.
अध्यक्षीय भाषणात मुत्यलवार म्हणाले की वाढदिवसा प्रसंगी विद्यार्थ्यांनी मिळून एक संविधान पुस्तक भेट म्हणून द्यावे. वाढदिवसा निमित्त चॉकलेट, खाऊ व इतर विद्यार्थ्याना न वाटता उपयोगी पुस्तके भेट म्हणून दिल्यास आपल्याच भावडाना ते उपयोगी पडेल. तसंच शाळेच्या ग्रंथालयात पुस्तकांची संख्या सुद्धा वाढेल.
या कार्यक्रमाचे सूत्रसचालन वर्ग 10 वीची विद्यार्थीनी प्राजक्ता मेश्रामने केले. तर आभार प्रदर्शन कु. दिव्या तुमाने हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भादीकर, काटकर तसंच शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.