परसोडा घाटावरील रेती तस्करी थांबविण्या करिता रस्त्यावर खोदले खड्डे

तहसीलदार जोशी व नायब तहसीलदार खिरेकर यांचे प्रयत्न

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील ४  व पिंपरड वाडी येथील ३ असे सहा ते सात रेती तस्करांनी कहर केला असून तहसीलदार यांना न जुमानता मुजोरी धोरण अवलंबून खुलेआम दिवसरात्र रेतीची चोरी करून तस्करी करीत आहे. तालुक्यात घर,दुकान व इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून याचा फायदा वरील दोन्ही  गाववतील रेती चोरटे  विक्री करीत आहे.  तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यान8 रेती चोरटयाना पकडण्याकरिता अतोनात प्रयत्न केले परंतु  “घर का भेदी लंका ढाये” सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महसूल विभागातच काही कर्मचारी हे अधिकाऱ्यांची माहिती रेती तस्करणा देत असल्यामुळे रेती तस्करवर धाड टाकण्यात अपयशी ठरत आहे. महसूल व्यातिरिक्त पोलीस कर्मचारीही महिन्याकाठी मलिदा लाटत असल्यामुळे हे सुद्धा तहसीलदार व नायब तहसीलदार यांना मदत न करता रेती चोरट्यांना मदत करीत असतात. यापूर्वी परसोडा  घाटावरून पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचोरी सुरू असल्याची माहिती  नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर यांना मिळताच त्यांनी तलाठी शेंडे पोलीस पाटील मनोज पन्नामे यांना आदेश देऊन परसोडा घाटावर जाणाऱ्या मार्गावर ४ ते ५ फूट लांबी व रुंदीचे अनेक खड्डे केले. 
खड्डयांमुळे ट्रॅक्टर जाणार नाही व रेती तस्करीला आळा बसणार असा अंदाज होता. परंतु वरील रेती चोरट्याने खोदलेले खड्डे दोन दिवसांपूर्वी रात्री जाऊन बुजविले व पुन्हा रेतीचोरी सुरू केली. रेती चोरटे काही पोलिसांना व महसूल कर्मचाऱ्यांना हातशी धरून त्यांना आर्थिक मदत व पार्टी देऊन खुश करीत असल्यामुळे रेतीचोरीत  प्रचंड वाढ झाली आहे.  रेती चोरटे खुलेआम रेतीची चोरी करून जनतेला ५ ते ६ हजार रुपये ब्रास प्रमाणे विकून लाखो रुपये कमवीत आहे.  रेती चोरटे रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत रेतीचोरी करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत आहे.
       
महसूल विभागाची टीम रेतीचे ट्रॅक्टर पकडण्याकरिता  येणार असल्याची माहिती  रेती चोरट्याना  काही गद्दार कर्मचारी देत असल्यामुळे  रेतीचे ट्रक्टर पकडण्यात तहसीलदार व नायब तहसीलदार यांना अडचण निर्माण होत आहे.पोलीस फक्त स्वतःच्या फायद्याचे ट्रॅक्टर किंवा ट्रक असेल तरच पकडतात अन्यथा झोपेचे सोंग घेऊन असतात.  मुकुटबन ,पिंपरड ,नेरड तेजापूर,अडेगाव ,साखरा, शिंदीवाढोना येथील रेती तस्कर परसोडा,मुंजाळा, व नेरड येथील पैनगंगा नदीतील व  शिंदीवाढोना व नेरड नसल्यातून मोठी रेतीचोरी करीत आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे शासन व प्रशासन पुन्हा जागे झाले. परसोडा घाटारून पैगंगेच्या पात्रातून रेतीचोरी होऊ नये याकरिता तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन घाटावरील रेती चोरी थांबविण्याचा निर्णय घेतला. 
महसुलाच्या कर्मचारी यांना घाटातून नदीच्या पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे करून मार्ग बंद करण्यात आला. ज्यामुळे मुकुटबन व पिंपरड वाडी येथील रेतीचोरावर अंकुश लागणार आहे. या घाटाकडे तहसीलदार व नायब तहसिलदार यांचे विशेष लक्ष आहे.  मुकुटबन व पिंपरड वाडी येथील ट्रॅक्टर मालक हे चालक व मजुरांना शेतात रात्री दारू व मटणाची पार्टी देऊन खुश करतात व रेतीचोरी करतात. मुकुटबन व पिंरडवाडी अडेगाव यांनी मुंजाळा घाटावरून रेतीचोरी सुरू केली आहे. या रेती चोरट्याना पकडून फौजदारी गुनह्या सह मोठा दंड वसूल करावी अशी मागणी जोर धरत आहे. या रेतीचोरी मध्ये पाहू राजकीय पांढरपेशी सुद्धा समाविष्ठ आहे जे स्वतःला समाजसेवक म्हणून वावराचे व रात्रीं चोरी करायची असे धंदे सुरू आहे.रेती तस्करसह महसूल व पोलीस विभागातील गद्दार कर्मचाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

 

 हे देखील वाचा: 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.