जितेंद्र कोठारी, वणी : पैनगंगा नदी पात्रातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करीत असताना दोन ट्रक्टर तलाठ्याने अडविले. मात्र दोन्ही ट्रक्टर चालकाने ट्राली मध्ये भरलेली रेती नदी पात्रात खाली करून ट्रक्टर पळवून नेले. तलाठ्याच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही ट्रक्टर चालकाविरुद्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवन अशोक बद्दमवार रा. दुर्भा, ता. झरी व एक अनोळखी असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक्टर चालकाचे नाव आहे.
मौजा दुर्भा येथील तलाठी राजू बळवंतराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 17 ऑक्टो. सकाळी 9 वाजता दरम्यान दुर्भा गावालगत पैनगंगा नदी पात्रातून रेती भरून येत असलेले दोन ट्रक्टर थांबवून चौकशी केली. ट्रक्टर क्रमांक MH 29 BV 7533 वर बसून असलेले नवन अशोक बद्दमवार व ट्रक्टर क्र.TS01U 58 असे अर्धवट नंबर असलेले ट्रक्टर चालकाला रेती वाहतूक परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे तलाठी मोरे यांनी दोन्ही ट्रक्टर पोलीस ठाण्यात घेऊन चालण्यास सांगितले.
तलाठी मोरे यांच्या आदेशाला धुडकावून दोन्ही ट्रक्टर चालकाने ट्रालीमध्ये भरलेली 2 ब्रास रेती नदी पात्रात खाली करून ट्रालीसह ट्रक्टर पळवून नेले. त्यामुळे नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन, वाहतूक तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार तलाठी राजू मोरे यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी नवन अशोक बद्दमवार वय अंदाजे 30 वर्ष रा. दुर्भा, ता. झरी व एक अनोळखी विरुद्द कलम 188, 379, 511 भादवि तसेच महाराष्ट्र जमीन आचार संहिता कलम 48(7) व 48(8) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.