अवघ्या 60 रुपयांपासून घरगुती कुरडई, पापड, शेवई उपलब्ध
बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या खाद्यसंस्कृतीत वाळवणाला एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक सणामध्ये जशी पुरणपोळी आली, तसं त्याच्या सोबतीला वाळवण आलंच पाहीजे. त्याशिवाय महाराष्ट्रीय ताट पूर्ण होत नाही. लवकरच आमरसाचा सिजन सुरू होईल. त्या सोबत पापड, कुरडई, शेवई नसेल तर आमरसाला मजाच नाही. उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे वाळवण तयार करण्याचा सिजन सुरु झाला आहे. मात्र अनेकांना वाळवण तयार करायला वेळ मिळत नाही किंवा योग्य प्रकारे बनवता येत नाही. आता यावर चिंता करण्याची आता गरज नाही. कारण आपल्या वणीतीलच संध्याई गृहउद्योग तर्फे विविध होममेड वाळवण ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. यात कुरडई, गव्हाचे पापड, मुंग वडी, तांदुळ पापड, तांदुळ चकली, बटाटा चिप्स, बटाटा साबुदाना पापड, बटाटा साबुदाना चकली, पाणीपुरी पापडी, शेवई, ज्वारी पापड (धापुडे) इत्यादी विविध प्रकारचे वाळवण उपलब्ध आहेत. तर मुंगवडी व ज्वारी पापड यांना विशेष प्रसिद्ध आहेत. 9112978429 (Whats App), 7058878429 या क्रमांकावर संपर्क साधून ग्राहकांना ऑर्डर देता येणार आहे.
वाळवणाचे विविध प्रकार हे 100 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत पॅकेट्स उपलब्ध आहेत. हे सर्व प्रकार अवघ्या 60 रुपयांपासून (100 ग्रॅम) उपलब्ध आहेत. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार ऑनलाईन ऑर्डर (मोबाईल कॉल) करता येऊ शकते. किंवा घरी भेट देऊनही आपल्या पसंतीनुसार ऑर्डर करता येऊ शकते. विशेष म्हणजे या गृह उद्योगाला FSSAI क्रमांक असल्याने दर्जा आणि शुद्धतेची संपूर्ण राहील.
मुंगवडी आणि ज्वारी पापडांची परराज्यात भरारी
संध्याई गृहउद्योग हे आपल्या वणीतीलच स्टार्टअप असून होतकरू महिला हा गृह उद्योग चालवतात. होतकरू महिलांना यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे. इथे तयार होणारे ग्रामीण खाद्य हे महिला स्वत: तयार करतात. त्यामुळे तयार होणा-या सर्व पदार्थांना मशिनची नाही तर हाताची गोडी आहे. संध्याई गृहउद्योगच्या मुंगवड्या व ज्वारीचे पापड सर्वात प्रसिद्ध आहे. वणीसह वरोरा, चंद्रपूर, हिंगनघाट, यवतमाळ, पांढरकवडा या गावात देखील ग्राहक घेऊन जातात, विशेष म्हणजे वणीतील मुंबई, पुणे, दिल्ली इथे राहणारे अनेक लोक आवर्जून परत जाताना मुंगवडी व ज्वारी पापड घेऊन जातात.
आमरस, बासुंदी, खीर यासोबत वाळवण तळून खाण्याची आपल्याकडे खाद्य प्रथा आहे. शिवाय लग्नकार्यात रुखवंतात मुलीला रुखवंतातही वाळवणाची भेट दिली जाते. उन्हाळ्यात अनेकांना वेळे अभावी वाळवण तयार करणे शक्य नसते. किंवा तयार केले तरी चवीबाबत खात्री नसते. त्यासाठी संध्याई गृहउद्योग येथील विविध वाळवळ एक चांगला पर्याय आहे. इथले शेवई, पापड, कुरडई, मुंगवडी इत्यादी वाळवण एकदा नक्की ट्राय करा, असे आवाहन संध्याई गृहउद्योगातर्फे करण्यात आले आहे.
पत्ता: संध्याई गृह उद्योग
वार्ड नंबर 20, रंगारीपुरा, वणी
मोबाईल नंबर – 9112978429
FSSAI No – 21521254000272
Comments are closed.