सुशील ओझा, झरी: कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रादुर्भाव पाहून ग्रामपंचायत धानोरा मार्फत संपूर्ण गावात निर्जंतुकीकण फवारणी करण्यात आली. तसेच धानोरा जुना, धानोरा नवीन, व गाडेघाट मिळून 430 कुटुंबाला घरोघरी जाऊन सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तर टाकळी ग्रामपंचायतीने गावातील गल्ली रस्ते व इतर ठिकाणी फॉग मशिनद्वारे फवारणी करून गाव निर्जंतुक केलं. यावेळी सरपंच संदीप बुर्रेवार व सचिव प्रकाश बळीत व ग्रामपंचायत कर्मचारी राजू गोपेवार व वसंत राडेवार व अवि पोतराजवार व नितीन बतुलवार उपस्थित होते.
धारोरा येथील कार्यक्रमात सरपंच सौ वैशालीताई संतोषराव माहुरे, ग्रामसेवक श्री युनूस सैय्यद, पोलीस पाटील गजानन मासटवार, तलाठी मुंजेकर, कृषि सहायक बोडखे, उपसरपंच विजयाताई आशन्ना चेन्नूरवार, ग्रामपंचायत सदस्य- शालीक सासनवार, बापूराव पैसटवार, विकास पवार, सीमाताई रामचंद्र नागपुरे.
सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ माहुरे, आरोग्य सेविका सुषमा चरडे, सौ सिडाम, अंगणवाडी सेविका सौ कालिंदा केळवतकर,सौ मनीषा बरपटवार आशा सेविका सौ ताई पवार,सौ बोरकर, मदतनीस सौ कुसुम पोतराजवार, ग्रामपंचायत कर्मचारी दत्तू भोयर, देविदास राखूनडे ,ग्रामपंचायत मित्र निलेश पवार, नामदेव ठाकरे यांचे सहकार्य लाभले.