आजपासून वणीत संत रविदास जयंती महोत्सवाला सुरूवात

3 दिवस विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत आजपासून संत रविदास जयंती महोत्सव सुरू झाला आहे. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 13 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता जन्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानंतर ‘भगवानवाणी’ हा राष्ट्रीय प्रबोधनकार भगवान गावंडे यांचा मनोरंजनातून प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक 14 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत प्रा. जावेद पाशा यांचे व्याख्यान होणार आहे. दिनांक 15 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांनतर लगेच 11 वाजता प्रबोधन केंद्राचे उद्घाटन, मूर्ती स्थापन, गुणगौरव सोहळा होणार आहे. यावेळी कुणाल चोरडिया आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सीमा पाटील, मुंबई यांचा शाहिरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांचा वणी उपविभागातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संबा वाघमारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा उपाध्यक्ष महेश लिपटे, दौलत वाघमारे, राजू वाघमारे, संदीप वाघमारे, प्रदीप खोब्रागडे, महादेव खंडाळे, प्रकाश राजुरकर, भारत लिपटे, योगेश सोनोने, आशिष डूबे, आकाश डुबे, अक्षय टिकले, संतोष आपटे, संतोष मुळे, मंगेश सोनोने प्रेमिला सोनोने, अंजू बांगडे, पुष्पा खंडाळे, वंदना हांडे, मीनाक्षी दुबे, दिपाली वाघमारे, संगीता येरेकर, प्रिया डुबे, प्रणोती बांगडे, प्रज्ञा इसाळकर, भारती वाघमारे इत्यादी परिश्रम घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.