वणी तालुक्यात ठीकठिकाणी संत रविदास महाराज जयंती साजरी  

भालर, ब्राह्मणी, मुर्धोनी, नांदेपेरा, पुरड, दहेगाव येथे संत रविदास महाराज यांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी:  समतेचे अग्रदूत संत रविदास महाराज यांची जयंती 22 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभागतर्फे तालुक्यातील भालर, ब्राह्मणी, मुर्धोनी, नांदेपेरा, पुरड, दहेगाव येथे जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भालर येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामप्रसाद येरेकर आणि इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाखेचे अध्यक्ष सुरेश टिकले, उपाध्यक्ष हनुमान वादेकर, सचिव पंकज वादेकर आणि अन्य सदस्यांनी केले. सोबतच भालर ग्रामपंचायतीने देखील संत रविदास महाराज यांची जयंती साजरी केली.

ब्राह्मणी शाखेतर्फे देखील संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. मुर्धोनी येथे आयोजित रविदास जयंती कार्यक्रमात शाखेचे अध्यक्ष अमोल डूबे, सुनील डूबे, विकी नवले, महेश डूबे, सचिन येरेकर, दिनेश डूबे आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेपेरा शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात शाखेचे अध्यक्ष रामा कोल्हे, उपाध्यक्ष प्रवीण कोल्हे, सचिव विकास खोले व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

 

पुरड येथे आयोजित जयंती कार्यक्रमात शाखेचे अध्यक्ष प्रवीण डूबे, उपाध्यक्ष कवडू टिपले, सचिव रोहित भटवलकर, संपर्कप्रमुख सुबोध बांगडे, रोशन भटवलकर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहेगाव घोन्सा येथे शाखेचे पदाधिकारी प्रशांत लांडे, भीमराव लांडे व समाजबांधवाच्या उपस्थितीत संत रविदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या आयोजनासाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणी शाखेने प्रोत्साहन दिले.

Comments are closed.