लवकरच येणार एलआयसीचा आयपीओ… गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी

आयपीओबाबत वणीत मोफत मार्गदर्शन, एकदा संपर्क साधण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देशातील गुंतवणुकदार आतुरतेने वाट पाहत असलेल्या एलआयसी आयपीओचा मुहूर्त अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे. शेअर बाजारातील सहभागींसाठी हा आयपीओ सणापेक्षा कमी नाही. भारतातील सर्वात मोठा आणि बंपर आयपीओ (Mega IPO) मार्चच्या मध्यात दलाल स्ट्रीटवर दाखल होऊ शकतो. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे. विशेष म्हणजे एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओमध्ये 10 टक्के राखीव राहणार आहे. वणीतील मोतीलाल ओसवाल इनव्हेस्टमेंट सर्विसेसद्वारा एलआयसीच्या आयपीओबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जे नव्यानेच शेअर बाजारात गुंतवणूक करणार आहेत. अशा नव गुंतवणूकदारांना डीमॅट अकाउंट ओपन करण्यापासून ते आयपीओपर्यंत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे शेवाळकर कॉम्लेस येथील कार्यालयात एकदा भेट द्यावी असे आवाहन शेअर मार्केट एस्पर्ट निखिल भोयर यांनी केले आहे.

पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के राखीव शेअर्स
ज्या गुंतवणुकदारांकडे आधीपासूनच एलआयसीची पॉलिसी (LIC) आहे, अशांसाठी या आयपीओमध्ये 10 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात येणार आहेत. म्हणजेच अशा विमाधारकांना आयपीओमध्ये गुंतवणुकीची अधिक संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर भांडवलाच्या आधारे बाजारात देशातील सर्वात मोठी कंपनी असेल. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर असेल आयपीओसंदर्भात सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सरकार 31 कोटी इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे.

एलआयसी हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा विमा ब्रँड
भारतात एलआयसीच्या सुमारे 290 दशलक्ष पॉलिसी आहेत, अनेकजणांकडे एकापेक्षा जास्त पॉलिसी आहेत. अशा स्थितीत पॉलिसीधारकांची एकूण संख्या 20 ते 25 कोटींच्या दरम्यान असू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत या प्रचंड आयपीओमुळे बाजारात गुंतवणुकदारांची संख्या झपाट्याने वाढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नवगुंतवणूकदारांना मोफत मार्गदर्शन – रोहित काकडे
सध्या शेअर बाजार घसरण असल्याने नवगुंतवणूकदारांना गुंतवणुकीची ही सुवर्ण संधी आहे. ज्या लोकांना या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. किंवा जी व्यक्ती या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहेत. अशा व्यक्तींना मोफत मार्गदर्शन तसेच यासाठी लागणा-या सर्व तांत्रिक बाबी मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार. शिवाय ज्या व्यक्तींना शेअर मार्केटचे ज्ञान शु्न्य आहे अशा व्यक्तींनाही मोफत बेसिक कोर्स शिकवला जाईल. शहरात शेकडो व्यक्तींनी या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतला असून आज ते यशस्वीरित्या शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करित आहे. त्यामुळे इच्छुकांनी एकदा संपर्क साधावा.
– रोहित काकडे, शेअर मार्केट एक्सपर्ट, मोतीवाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट सर्विसेस

पत्ता: मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट सर्विसेस
टपरीकी चाय ब्लॉकच्या वर, शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड, वणी
मोबाईल नंबर – 7743906960  (रोहित काकडे) 9823160229 (निखिल भोयर) 

 

Comments are closed.