सरपंच संघाच्या अध्यक्षपदी अजय कवरासे तर सचिवपदी हेमंत गौरकर

वणीतील शासकीय विश्राम गृहात ग्रामसंवाद सरपंच संघाची कार्यकारिणी जाहीर

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य ग्रामसंवाद सरपंच संघाची वणी तालुका कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. स्थानिक विश्राम गृहात जिल्हाध्यक्ष विठ्ठल आडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ठाकोरी ग्रा.पं.चे सरपंच अजय कवरासे तर सचिवपदी खांदला ग्रा. पं.चे सरपंच हेमंत गौरकर यांची निवड करण्यात आली.

Podar School 2025

आज शनिवारी दिनांक 10 जुलै शासकीय विश्राम गृहात सरपंच संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला कार्याध्यक्ष बापूराव पवार त मार्गदर्शक म्हणून ऍड. देवा पाचभाई, प्रशिक्षक म्हणून मारोती पाचभाई, संतोष आस्वले, तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप भोयर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी ग्राम पंचायत समस्या व कामकाज संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामसंवाद सरपंच संघाची पुढील कार्यकारणी घोषित करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुका उपाध्यक्ष म्हणून माथोली ऍड. आशिष मडावी, नेरड ग्रा. पं. चे सरपंच सुवर्णा विठ्ठल जुनगरी, कुंभरखानी ग्रा. पं. सरपंच मंगला टेकाम, सरचिटणीस म्हणून कोळगाव ग्रा.पं. सरपंच गणेश जनेकर, लालगुडा ग्रा.पं. उपसरपंच निलेश कोरवते, नांदेपेरा ग्रा.पं. सदस्य राकेश खानकार, शिवानी ग्रा. पं. सरपंच स्वाती राजूरकर, तर तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून कोणा ग्रा.पं. सदस्य नितीन तुरणकार, तालुका सोशल मीडिया प्रमुख म्हणून शिरपूर ग्रा.पं. सरपंच जगदीश बोरपे, तर सदस्य म्हणून म्हणकालपुर ग्रा.पं. सरपंच नीलिमा बोन्डे, चनाखा ग्रा.पं. उपसरपंच शुभम मत्ते, वडगाव ग्रा.पं. सरपंच अर्चना प्रमोद डाखरे यांची निवड करण्यात आली.

हे देखील वाचा:

वणीत साई हॉस्पिटलमध्ये 24×7 अतिदक्षता विभाग सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.