श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहाचा आरंभ 

पहिल्याच दिवशी डॉ. स्नेहाशीष दास यांच्या भक्तिसंगीताची मैफल 

0
गिरीश कुबडे, काटोलः श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गायक तथा महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. स्नेहाशीष दास आणि त्यांच्या शिष्या प्रीती देशमुख यांच्या भक्तिसंगीताची मैफल झाली. यात पखवाजची साथ महेंद्र बोडे, तबल्याची साथ राहुल बलखंडे, व्हायोलीनची साथ हरीश लांडगे, हार्मोनियमची साथ मोहन पोकळे, ऑक्टोपॅडची साथ वीरेंद्र गावंडे, की-बोर्डची साथ दीपक चौधरी तर सहगायन संगीता गावंडे व लक्ष्मी गायकवाड करतील. या भक्तिसंगीताच्या मैफलीचे निवेदन कवी व लेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

श्री गणेशवंदनेने कार्यक्रमाचा आरंभ झाला. मेरे मन के अंध तमस मे या गीताने नादब्रह्माचा अविष्कार रसिकांनी अनुभवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सेजरंजनी रागातील ‘हे गुरुदेव मेरे दिल आओ’’ या रचनेने गुरुवंदनेची पावती दिली. गुळाचा गणपती या चित्रपटातील इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गदिमांचं गीत उपस्थितांच्या विशेष पसंतीस ठरले. मैली चादर ओढ के कैसे, आता कोठे धावे मन, आई गेेली जसे लेकरा समाधीत जरी लक्ष्य तुझियावरी, आनंदमयी, चैतन्यमयी अशा अनेक भक्तिगीतांनी उपस्थितांना तृप्त केले. सती अनसूयेच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर सुनील इंदुवामन ठाकरे यांनी आपल्या निवेदनातून प्रकाश टाकला.
Leave A Reply

Your email address will not be published.