‘युग’च्या मदतीला धावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरु
आज नितेश ठाकरे, अनिल आसुटकर, अजिंक्य शेंडे व उमेश पोद्दार यांची मदत
तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील चिमुकल्या युगला बालवयातच कॅन्सरने ग्रासले. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शिंदोलावाशीयांनी मदतीचा हात दिला. ‘वणीबहुगुणी’ न्युज पोर्टलवर बातमीच्या माध्यमातून युगसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत वणीकरांची माणुसकी धावून आली. मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राम कृषी केंद्राचे संचालक नितेश ठाकरे यांनी 5,000, अनिल आसुटकर, अजिंक्य शेंडे यांनी 1,000 रुपयांची मदत केली. यासह व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनीही भरीव आर्थिक मदत केली आहे. वणीकरांच्या मदतीचा ओघ बघून युगच्या आईवडिलांना आशेचा किरण दिसू लागला आहे. दरम्यान युगच्या मदतीसाठी गुगलपे/ फोन पे नंबर उपलब्ध नसल्याने अनेकांना आर्थिक मदत करता आली नाही. ही अडचण लक्षात घेऊन आता गुगुल पे/फोन पे नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. थेट अकाउंट नंबरसह आता दानदात्यांना ऑनलाईन देखील मदत करता येणार आहे.
(कैलास वारलू मालेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा शिंदोला. खाते क्रमांक 005411002100647
IFSC Code – UTIB0SYDC54)
संपर्क क्रमांक:6026626308, 9921674309गुगल पे नंबर-
(Google pay: 9405150926
सरपंच- विठ्ठल बोंडे, शिंदोला)
(Google pay: 7038204209
सागर जाधव, स्माइल फाउंडेशन, वणी)
वणीबहुगुणीच्या ‘save yug campaign’ ला प्रतिसाद दिला त्यात हाण रट्टा क्रीडा (व्हॉलीबॉल) मंडळाने 45 हजार रुपयांची मदत केली. यात योगेश खिवंसरा, रवि वांढरे, संतोष पाचभाई, महेश पहापळे, सिद्धिक रंगरेज, मिलिंद बोढाले, प्रवीण वासेकर, निलेश दासरवार, विलास गौरकार, विनोद घुंगरूड, सुदीप गौरकार, भुपेंद्र देरकर, ललित लांजेवार, राजकुमार तुराणकर, तुषार वाघमारे, राजुभाऊ फरताडे, महादेव पानघाटे, सुधीर काळे, दीपक रासेकर, शंकर देरकर, जीतूभाऊ जांगडा, सुनील डोंगरकर, मधू कोंगरे, किशोरभाऊ झाडे, यांचा मोलाचा वाटा आहे. या मंडळींनी सदर रक्कम युगच्या वडिलांकडे सुपूर्द केली. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, राजू तुराणकर यांची उपस्थिती होती.
वणी येथील सायकल ग्रुप युवा मित्र परिवाराचे सदस्य विनोद घुंगरूड, देवेंद्र खरवडे, जगदीश ढोके, छगन कुचनकार, प्रवीण भोयर, प्रा.विकास जुनगरी, छगन गारघाटे, विशाल कुंभारे, मंगेश रासेकर, संदेश पानघाटे, हरीश पिदूरकर, संतोष ढुमणे, पांडुरंग मोडक, सचिन पिंपळकर, सचिन ढोके, विजय चव्हाण, डॉ.जगन जुनगरी, प्रदीप बोरकुटे, जगदीश नागपुरे, मंगेश ताजने, डॉ.चंद्रकांत झाडे, विकास जेणेकर यांनी रोख 10,000 रुपयांची मदत युगच्या वडिलांकडे सोपवली.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा मारेगाव येथील शाखा व्यवस्थापक गीता गेडाम, लेखापाल संतोष पाचभाई, रोखपाल प्रवीण गारघाटे, लिपिक तुषार बलकी, विनय पिदूरकर, पूजा गौरकार, सुशील शेंडे, प्रवीण मोहितकर यांनी 4,500 रुपयांची मदत केली. राम कृषी केंद्राचे संचालक नितेश ठाकरे यांनी 5,000, अनिल आसुटकर यांनी 1,000 रुपयांची मदत केली. यासह उमेश पोद्दार यांनीही मदत केली आहे.
युगच्या उपचारावरील खर्च पाहता आणखी मदतीची गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ‘वणी बहुगुणीशी’ आपण संपर्क साधू शकता.
(आणखी ज्यांनी कुणी मदत केली आहे त्यांनी नावे ‘वणी बहुगुणी’ (9096133400) कडे कळवावे. त्यांची इच्छा असल्याच नावे प्रकाशित करण्यात येईल व त्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळेल.)
हे देखील वाचा:
मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Comments are closed.