वणीत 4 जानेवारीला ‘महाएल्गार’ शेतकरी मेळावा

बच्चू कडू, वामनराव चटपांसह नेत्यांची उपस्थिती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरात येत्या रविवारी, 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता शासकीय मैदानावर शेतकरी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला माजी मंत्री बच्चू कडू, शेतकरी नेते वामनराव चटप, प्रकाश पोहरे, डॉ. अजित नवले, राजू शेट्टी, रवीकांत तुपकर, महादेव जानकर, रघुनाथ पाटील, राजन क्षीरसागर, अनिल घनवट यांच्यासह विविध सामाजिक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. शेतमालाला योग्य दर, कर्जमाफी, वीज-पाणी प्रश्न, पीक विमा तसेच शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न यावर ठोस आवाज उठविण्यात येणार आहे.

या मेळाव्यामुळे शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे सतीश देरकर, अनिल घाटे, देवराव धांडे, दशरथ बोबडे, अनिल गोवारदिपे, प्रहार संघटनेचे मोबिन शेख तसेच रघुवीर कारेकर यांनी केले आहे.

 

Comments are closed.