आजपासून दोन दिवस क्रां. सावित्रीबाई फुले वाचनालयात विविध स्पर्धेचे आयोजन
चित्रकला, निबंध, वाचन इ. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेण्याचे आवाहन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील विठ्ठलवाडी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयानिमित्त वणीमध्ये 7 व 8 जानेवारीला विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या स्पर्धा होणार आहे. ७ जानेवारी २०२३ ला दुपारी १२:०० वाजता चित्रकला स्पर्धा यामध्ये गट (अ) वर्ग १ ते ४ थी यात माझी शाळा हा विषय राहणार आहे. गट (ब) वर्ग ५ ते ८ वी असून यात छत्रपती शिवाजी महाराज अथवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दे दोन विषय राहणार आहेत. तर गट (क) वर्ग ९ ते १२ वी साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा मदर टेरेसा यांचे चित्र काढायचे आहे.
७ जानेवारी २०२३ ला सायंकाळी ०५ :०० वाजता प्रकटवाचन (रिडिंग) स्पर्धा होणार आहे. गट (अ) यात वर्ग ३ ते ५ वी तर गट (ब) मध्ये वर्ग ६ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. या स्पर्धकांना मराठी, हिन्दी व इंग्रजी भाषेतील उता-यांचे वाचन करायचे आहे.
रविवारी दिनांक ८ जानेवारी २०२३ ला निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात गट (अ) हा वर्ग ५ ते ८ वी साठी असून यात राजमाता जिजाऊ हा विषय राहणार आहे, तर गट (ब) हा वर्ग ९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. यात परीक्षा पद्धती बंद केली तर… असा विषय राहणार आहे.
या २ दिवशीय स्पर्धांमध्ये वणीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात वाचनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी उमेश रासेकर व शुभम कडू यांना संपर्क साधायचा आहे. मोबाईल. 7057676129 , 8600507496
Comments are closed.