ब्राह्मणी फाट्याजवळ तंबाखू तस्कराला अटक

पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश, 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुगंधित तंबाखूसह 5 लाख 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई गुरुवार 19 मे रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास वणीतील ब्राह्मणी फाट्यावर करण्यात आली. या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाये.

19 मे रोजी सायंकाळी घुग्गुस कडून एका चारचाकी वाहनात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित तंबाखू येत असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोकॉ सचिन मरकाम हे नजर ठेवून होते. त्यांना सांगितलेल्या वर्णनानुसार एक चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH 40 A 9043 वाहनाला अडवून तपासणी करण्यात आली.

सदर वाहनामध्ये मजा कंपनीचा प्रतिबंधित तंबाखू 200 ग्राम वजनाचे 200 डब्बे व 50 ग्राम वजनाचे 400 डब्बे असा एकूण 2 लाख 27 हजार 400 रुपयांचा तंबाखू व या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन किंमत 3 लाख असा एकूण 5 लाख 27 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गाडीचा चालक सुभाष शंकर गेडाम याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्यावर घनश्याम पंजाबराव दंदे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादी वरून कलम 328, 272, 273, 188 सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमने 2011 चे कलम 26 (2) कलम 27, कलम 30 (2) (अ) व शिक्षा पात्र कलम 59 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी आशिष झिमटे करीत आहे.

हे देखील वाचा:

ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू

हॉरर कॉमेडी भुलभुलय्या 2 आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजसाठी प्रवेश सुरू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.